आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नालासोपारा स्फोटक प्रकरण..जळगावमधून आणखी एकाची चौकशी करून सोडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- किरण मराठे या तरुणाला चार ते पाच तास चौकशी करून एटीएसच्या पथकाने साखळी गावात रात्री येऊन सोडले आहे. हा तरुण हा नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गावातील वासुदेव सूर्यवंशी व विजय उर्फ भैय्या लोधी या दोघांचा मित्र आहे. त्याला जळगाव येथून सायंकाळी पथकाने ताब्यात घेतले. त्याची गाडीतच सुमारे चार ते पाच तास चौकशी केली तसेच त्याच्या दोन मित्रांच्या संदर्भात काही माहिती जाणून घेतली. एटीएसच्या पथकाला तपासात आवश्यक ते सहकार्य करण्याच्या अटीवर त्याला सोडण्यात आले. 

 

नालासोपारा स्फोटक प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी साकळी येथील राहाणार्‍या एका तरूणाला जळगाव येथून ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. तरूणाचे नाव किरण निंबादास मराठे (28) असे आहे. या आधी 6 सप्टेंबरला वासुदेव भगवान सूर्यवंशी व 7 सप्टेंबरला विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी या दोघांना अटक केली होती. दोघांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांच्या चौकशीअंती एटीएसने ही कारवाई केल्याचे समजते.

 

बुधवारी सायंकाळी जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालया समोरून एटीएसच्या एका पथकाने किरण निंबादास मराठे यास ताब्यात घेतले आहे. किरण मराठे हा साकळी दंगलप्रकरणी संशयीत आरोपी आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडून करण्यात आलेल्या चॅप्टर केसचा जामीन मिळविण्यासाठी किरण जळगाव येथे गेला होता. किरण एका मित्रासोबत कार्यालयाबाहेर चहा पिण्याकरीता निघाला असता एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. किरणला सोबत घेऊन पथक नाशिककडे निघाल्याची माहिती मिळाली आहे. एटीएसने साकळीत एका आठवड्यात तिसर्‍यांदा कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...