आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल तालुक्यातून एटीएसने आणखी एकाला घेतले ताब्यात, नमाझ पठणासाठी गेला होता संशयित तरुण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील दहिगाव येथे शुक्रवारी दुपारी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई केली. चिनावल येथील राहाणार्‍या एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. हा तरुण त्याच्या मामाकडे आला होता.

 

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी साकळीमध्ये, नंतर रावेर तालुक्यातील चिनावल आणि आता पुन्हा दहीगावात कारवाई झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, द‍हिगाव येथे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एटीएस पथक दाखल झाले. अधिकार्‍यांनी गावातील रहिवासी शेख रफिक शेख सुलेमान यांचा भाचा अमीर हमीद मिस्तरी याला ताब्यात घेतले. त्याच्या मागावर एटीएसचे पथक दहिगावात दाखल झाले होते. शुक्रवार असल्याने संशयित तरुण मशिदीत नमाझ पठण करण्यासाठी गेला होता. त्याचे नमाझ पठण होईपर्यंत पथक मशिदीबाहेर ठाण मांडून होते. नमाझ अदा झाल्यानंतर तो बाहेर येतात अधिकार्‍यांनी त्याला ताब्यात घेतले. नंतर अधिकार्‍यांनी शेख रफीक पठाण यांच्याकडे तरुणाविषयी चौकशी केली. नंतर पथक संशयित तरुणाला रावेर मार्गावर घेऊन गेले.

 

पठाण कुटूंबातील सदस्यांनी घरात घेतले कोंडून...

दहीगावात पथक दाखल झाल्याची चर्चा संपूर्ण गावात वार्‍यासारखी पसरली. चौकशी नेमकी कोणची होत आहे, हे जाणून घेण्याचा प्रत्येक जण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, या संपूर्ण प्रकाराचा पठाण कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. त्यांनी अक्षरश: घरात कोंडून घेतले आहे.

 

चिनावलहून अ‍मीरचे वडील आणि भावाला घेतले होते ताब्यात...
एटीएसने चिनावल (ता.रावेर) येथून मंगळवारी (ता.23) रात्री हमीद इब्राहीम मिस्तरी व शोएब हमीद मिस्तरी  या पिता-पुत्राला ताब्यात घेतले होते. दोघांची चौकशी करून त्यांना दुसर्‍या दिवशी बुधवारी सोडून देण्यात आले होते. दहिगाव येथून ताब्यात घेतलेला अमीर हा हमीद इब्राहीम मिस्तरी यांचा मुलगा आहे. हमीद यांनी आपल्या नावावर घेतलेले सिमकार्ड दहिगाव येथे राहाणार्‍या मावशीला दिले होते. त्या सिमकार्डवर संशयास्पद कॉल आले होते. यावरून एटीएसने दोघांना ताब्यात घेतले होते.

 

अमीरला ताब्यात घेतल्यानंतर एटीएसच्या अधिकार्‍यांनी हमीद आणि शोएबलाही बोलावले होते. तिघांना हमीदच्या मावशीच्या घरी नेऊन अधिकार्‍यांनी चौकशी केली. मात्र, ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर अधिकार्‍यांनी अमीर, शोएब आणि हमीद या तिन्ही पितापुत्रांना शुक्रवारी सायंकाळी चिनावल येथे सोडून दिले.

बातम्या आणखी आहेत...