आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला..घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात झाली कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक महापालिकेच्या एका माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून फूटेज समोर आले आहेत.

 

हातात धारदार शस्त्र घेतलेले तीन जण माजी नगरसेवक सुरेश दळोद यांच्यावर हल्ला करताना सीसीटीव्ह फूटेजमध्ये दिसत आहेत. या हल्ल्यात सुरेश दळोद गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या हल्ल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे.

 

हल्ला झाला तेव्हा सुरेश दळोद हे नाशिकमधील द्वारका परिसरात असलेल्या त्यांच्या कार्यालयात जात होते. पप्पू तसंबड, पिंटू तसंबड आणि सोनू साळवे या तिघांनी सुरेश दळोद यांना रस्त्यात रोखले. तिघांनी एकाच वेळी तलवारीने सुरेश दळोद यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दळोद यांच्या हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दळोद यांच्या मदतीसाठी अालेला त्यांचा भाचा आणि मुलगा देखील जखमी झाले आहेत.

 

नाशिकमधील मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश दळोद यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.

बातम्या आणखी आहेत...