आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATS ने जालन्यातून पांगारकरच्या साथीदाराला केली अटक, चालवत होता झेरॉक्सचे दुकान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- डॉ. दाभोलकर हत्या व नालासोपारा स्फोटके प्रकरणात एटीएसने जालन्यातून आणखी एकास ताब्यात घेतले आहे.गणेश कपाळे असे संशयिताचे नाव असून यापूर्वी अटक केलेला माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरचा ताे साथीदार असल्याचे सांगितले जाते. 


गणेशचे जालन्यातील शनिमंदिर चौकात डीटीपी व झेरॉक्सचे दुकान आहे. पांगारकर याच दुकानात बसत हाेता. त्यामुळे गणेशवरही एटीएसला संशय अाहे. पोलिसांनी त्याच्या दुकानातील संगणकाची हार्डडिस्क जप्त केली. तसेच गणेश याला औरंगाबाद येथे चौकशीसाठी नेले. 


डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याच्या संशयावरून पांगारकर याला मुंबई एटीएसने १९ ऑगस्टला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएस कारवाई करत आहे. यादरम्यान माजी नगरसेवक खुशालसिंह ठाकूर याच्यासह आणखी एकाची चौकशी झाली आहे. अातापर्यंत या प्रकरणात तिघांची चौकशी झाल्याने जालन्यात या प्रकरणाचे आणखी धागेदोरे असल्याची शंका व्यक्त होत आहे. 

 

राणा ठाकूर सनातनचा साधक..
राणा ठाकूर हा सनातनचा साधक असल्याचे सांगितले जाते. जालना जिल्ह्यात तो विश्व हिंदू परिषदेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असल्याचे ओळखला जाते. 2014 मध्ये त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवलेली आहे.

 

छापासत्राने जालना जिल्ह्याचे राजकारण निघाले ढवळून
जालन्यात बॉम्बनिर्मिती, पिस्तुलाचे प्रशिक्षण दिल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपमध्ये विविध पदे भूषवलेल्या श्रीकांत पांगारकर व राणा ठाकूर यांची नावे माध्यमांत झळकली आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

 

या प्रकरणात एटीएसने आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले आहे. वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, अविनाश पवार, श्रीकांत पांगरेकर, राणा ठाकूर, गणेश कपाळेचा समावेश आहे. आरोपींचा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...