आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याणमध्ये रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेले, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनबाहेर एका रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसांला फरफटत नेल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, आशा गावंडे असे महिला वाहतूक पोलिसाचे नाव आहे. रिक्षाचालक नागेश अलवागिरी याच्याकडे त्यांनी परवान्याची मागणी केली. मात्र, रिक्षाचालकांने रिक्षा थांबवली नाही आणि आशा गावंडे यांना फरफटत नेले. यात आशा गावंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी एमएफसी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...