आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांनो लक्ष द्या...मुंबईत तुमच्या पाठीवरील बॅगेतील किमती वस्तू अशा होऊ शकतात लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक वास्तव आले समोर
  • अवघ्या 24 तासांत पोलिसांनी आरोपीला केले अटक

मुंबई- सावधान! मुंबईसह उपनगरातील रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर चालणे आता सुरक्षित राहिलेले नाही. तरुणांच्या पाठीवर असलेल्या बॅगची चेन उघडून त्यातून रोख रकमेसह एटीएम कार्ड चोरणार्‍या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

 

विरार स्टेशनवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेली घटना तर सगळ्यांनाच थक्क करणारी आहे. एक तरुण पाठीवर बॅग घेऊन प्लॅटफार्मवरून जात होता. दुसरा व्यक्ती ठिक तरुणाच्या मागे चालत होता. मोठ्या चलाखीने त्याने पुढे चालणार्‍या तरुणाच्या बॅगेची चेन उघडून रोख रकम आणि एटीएम कार्ड लंपास केले. ही घटना विरार स्टेशनवर 28 नोव्हेंबरला घडली. तरुणाने याप्रकरणी वसई जीआरपीकडे तक्रार केली. पोलिसांनी स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज पाहिले असता हे धक्कादायक वास्तव समोर आले.

 

पोलिसांनी फुटेजच्या मदतीने अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपीने दिलेल्या माहितीवरून टोळीतील इतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...