आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, शिवसेना आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद उद्भवण्याची चिन्हे  दिसत आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या; या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी मागणी केली. या संदर्भात सोमवारी शिवसेना आमदारांनी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

 

शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी सांगितले की, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा संपूर्ण महाराष्ट्राला जोडणार आहे. शिवसेनाप्रमुखांनी अखंड महाराष्ट्राला जोडण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्राला एकत्र जोडून ठेवण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे या महामार्गाला त्यांचे नाव देण्यात द्यायला हवे. आमचा समृद्धी महामार्गाला विरोध नव्हता. तर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत योग्य मोबदला मिळावा, हीच मागणी असल्याचे आमदार प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत यासंदर्भात निवेदन दिले होते.

 

बाळासाहेबांच्या नावाला यांचा कडाडून विरोध

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी

कडाडून विरोध केला आहे. अणे यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून शिवसेनेच्या मागणीला विरोध केला आहे. समृद्धी महामार्ग हे नाव वाईट आहे काय? असा सवालही अणे यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या एकाही नेत्याने विदर्भातील काहीही केले नाही. या एका कारणासाठी तरी शिवसेनेच्या नेत्याचे नाव समृद्धी महामार्गाला नको, असे श्रीहरी अणे म्हटले आहे.

 

भाजपला द्यायचे आहे अटल बिहारी वाजपेयींचे नाव..?

दुसरीकडे, समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यावरून भाजपकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...