आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई क्राइम ब्रँचने UPच्या दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या, Bank Robberyचा व्हिडिओ आला समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे झालेल्या बॅंक दरोड्यातील प्रमुख आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका खबर्‍याने द‍िलेल्या माहितीच्या आधारे क्राइम ब्रँचने ठाण्यातून आरोपील अटक केली. आरोपी नातेवाइकाला भेटण्‍यासाठी मुंबई आला होता.

 

असा टाकला होता बँकेवर दरोडा..

सुल्तानपूरमधील लंभुआ येथील बडोदा ग्रामीण बॅंकेवर 11 सप्टेंबरला 5 अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी बॅंकेच्या कॅशियरसह 15 अधिकार्‍यांना वेठीस धरले होते. जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कॅशियरकडून लॉकर उघडून त्यात जवळपास 8 लाख लुटले होते. ही घटना CCTV कॅमर्‍यात कैद झाली होती. दरोडेखोरांनी बॅंक कर्मचार्‍यांना मारहाणही केली होती. पोलिसांनी याप्रकरणी संशयीतांना ताब्यात घेतले होते. परंतु त्यांच्याकडून ठोस माहिती मिळाली नव्हती. मुंबई पोलिसांना माहिती मिळताच वांद्रये यूनिटने प्रमुख आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

 

बातम्या आणखी आहेत...