आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅंकेत मारताय नुसत्या फेर्‍या..तरीही होत नाहीये तुमचे काम; या अधिकार्‍याकडे करा तक्रार, क्षणात होईल तक्रारीचे समाधान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॅंक कर्मचारी ग्राहकांना चांगली वर्तवणूक देत नाहीत, अशी तक्रार कायम केली जाते. अतिशय क्षुल्लक कामासाठी ग्राहकाला बॅंकेत सारख्या फेर्‍या माराव्या लागतात. तसेच काही बँका तर ग्राहकांकडून विनाकारण शुल्क वसूल करतात. तुम्हालाही ही समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर आहे. बॅंकेकडून समाधानकारक सेवा मिळत नसेल तर तुम्ही थेट तक्रार करु शकतात.

 

येथे करू शकतात तक्रार...
आरबीआयनुसार, स्टेटमेंट चार्जेस, एटीएम ट्रान्झॅक्शन, क्रेडिट कार्डशी संबंधित समस्येसाठी तुम्ही बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार करू शकतात. शाखा व्यवस्थापकाकडे असलेल्या तक्रार नोंद वहीत तुम्ही संबंधित अधिकार्‍याच्या विरोधात लेखी तक्रारही करु शकतात. तसेच तुम्ही बँकेच्या वेबसाइटला व्हिजिट करूनही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात. एक महिना होऊनही तुमच्या तक्रारीचे निवारण झाले नाही तर तुम्ही थेट बॅंकिंग लोकपालाकडे तक्रार दाखल करू शकतात.

 

कोण असतो बॅंकिंग लोकपाल
- बॅंकिंग लोकपाल अधिकारीची नियुक्ती आरबीआयद्वारा केली जाते. इंडिया बँकिंग लोकपाल स्कीम 2006 अंतर्गत हा अधिकारी काम करतो.

- ग्राहकांच्या समस्येचे तत्काळ समाधान करणे, बॅंकिंग लोकपाल अधिकार्‍याचे मुख्य कार्य असते. सध्या वेगवेगळ्या राज्यात 15 पेक्षा बॅंकिंग लोकपाल नियुक्त करण्‍यात आले आहे  

- तुम्ही bankingombudsman.rbi.org.in या वेबसाइटला व्हिजिट करून ऑनलाइन बॅंकिंग लोकपालकडे तक्रार दाखल करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...