आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीचे अपहरण करून फुटबॉल ग्राऊंडवर केला सामूहिक बलात्कार, डोके दगडाने ठेचले, विवस्रावस्थेत झूडपात फेकले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची/मांडर- रांचीमधील मांडर परिसरात 23 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रांचीमधील अशोक नगरातून पीडिता मांडर येथे घरी जाण्यासाठी निघाली होती. नराधमांनी तिला रस्त्यात रोखले. तिचे अपहरण करून तिला धनबादमधील बरवाअड्डा प‍रिसरातील पंडुकी फुटबॉल ग्राऊंडवर नेऊन नराधमांनी तिच्यावर सामूहिक अ‍त्याचार केला. एवढेच नाही तर नराधमांनी तिला ठार मारण्याच्या हेतून तिच्या डोक्यात दगड घातला. यात पीडिता गंभीर जखमी झाली आहे. तिचा जबडा तुटला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

 

विवस्त्रावस्थेत झुडपात फेकले...

सामूहिक बलात्कार केल्यानंतर नराधमांनी पीडितेला विवस्रावस्थेत झुडपांमध्ये फेकले. पंडुकी गावातील लोकांना गंभीर जखमी अवस्थेत पीडिता दिसून आली. त्यांनी दिलेल्या सुचनेनंतर बरवाअड्डा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तरुणीला पीएमसीएचमध्ये दाखल केले. पोलिसांनी तिच्या अंगठ्याचा ठसा घेऊन तिची ओळख मांडर पोलिसांना दिली आहे. पीडितेच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.


घरी फोन केला.. मी येतीय, परंतु ती घरी पोहोचली नाही...
पीडितेच्या धाकटया बहिणीने सांगितले की पीडिता अशोक नगरात एका घरात मुले सांभाळण्याचे काम करत होती. परंतु त्या घरात पीडितेवर अत्याचार होत होता. तसे तिने आपल्या घरी सांगितले होते. घटनेच्या दिवशी पीडितेने घरी फोन केला होता. तिच्यावर अत्याचार होत असल्याचे तिने सांगितले होते. घरी येत असल्याचे तिने सांगितले होते. परंतु त्याच रात्री पीडिता बेपत्ता झाली. तिचा मोबाईलही स्विच ऑफ येत होता.

 

हातवारे सांगितले... 3 होते नराधम...
पीडिता बेशुद्ध अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती दोनदा शुद्धीवर आली होती. 3 नराधम होते, असे तिने पोलिसांना हातवारे सांगितले. मात्र, बलात्कारांची संख्या जास्त असेल, असे डॉक्टरांनी अंदाज व्यक्त केला आहे.

 

अशोक नगर ते मांडरदरम्यान नराधमांनी पीडितेचे अपहरण केले असावे. घटनास्थळी पोलिसांना दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...