पंतप्रधान नरेंद्र मोदी / पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरणार संघाचा बळीचा बकरा; अॅड. प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Oct 12,2018 09:12:00 PM IST

नाशिक- आजची देशाची वाईट स्थिती पाहता आणि संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता त्यांच्यावर केलेली सडकून टीका म्हणजे 2019 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचा बळीचा बकरा ठरणार आहेत, अशी टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

आंबेडकर म्हणाले, 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत भाजपची सत्ता येणार नसल्याची संघाची खात्री झाल्याचे स्पष्ट होते. भय्या जोशींच्या वक्तव्याने मला हिटलरची आठवण झाली. हिटलरच्या सहकाऱ्यांनीसुद्धा हिटलरवर अविश्वास दाखवला होता. तसेच आता आरएसएस आणि मोदींच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे नोटबंदी, न झालेले सर्जिकल स्ट्राइक आम्ही केल्याचे ते सांगत आहेत. अशीच संघाची भूमिका असेल. सरकार आले नाही तर कोणाला तरी बळीचा बकरा केला जाईल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तूर्तास मला त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसत आहेत. केवळ ते स्वत: बळी ठरतात की त्यांना बळी ठरवले जाते हे मात्र येणाऱ्या काळात ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

X