आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुलाचा आवाज ऐकल्यानंतर करण जोहर आणि कॅामेडियन भारतीला आवरता आले नाही रडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी वयातच या आजाराला सामोरे जावे लागले

 

मुंबई- 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या मंचावर 'प्रोजेरिया' नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या श्रेयसने परफॉर्म केला. श्रेयसने 1976 च्या 'चलते चलते' चित्रपटातील 'कभी अलविदा न कहना' गाणे गायले. त्याचा आवाज ऐकताच कॉमेडियन भारती सिंग आणि जज करण जोहर यांच्यासह प्रेक्षकही भावून झाले. भारती आणि करणला रडू आवरता आले नाही.

 

आपला आगामी चित्रपट 'बधाई हो'च्या प्रमोशनसाठी आलेला आयुष्मान खुराना याने श्रेयसची खूप कौतुक केले. श्रेयस 14 वर्षाचा आहे. परंतु तो प्रोजेरिया आजाराने ग्रस्त असल्याने तो म्हातारा दिसतो. 'पा' चित्रपटात अमिताभ बच्चनला हा आजार असल्याचे दाखविण्यात आले होते.

 

- प्रोजेरिया हा एक दुर्मिळ आणि अनुवांशिक आजार आहे. 8 पैकी एका बाळाला हा आजार होतो. ज्यामध्ये त्या मुलाचे शरीर सामान्य पेक्षा आठ पटीने लवकर म्हातारे दिसते. या आजारामुळे साधारण 14 वर्षातच ह्रदयविकाराने मुलांचा मृत्यु होतो. शारीरिक वाढ खुंटणे, वजन कमी होणे आणि केस कमी असणे, म्हाताऱ्या माणसांसारखी त्वचा असणे., हिप डिस्लोकेशन, सांधेदुखी आदी या आजाराची लक्षणे आहेत.

 

जगभरात साधारण 300 मुले या आजाराने ग्रासलेले आहेत. 2009 मध्ये आलेल्या 'पा' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी 'प्रोजेरिया'ने ग्रस्त असलेल्या ऑरोची भूमिका केली होतीळ. आर बाल्की दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि विद्या बालन हिने अभिताभ यांच्या आई-वडिलांची भूमिका केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...