आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी हे विष्णूचा 11 वा अवतार; भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचे ट्विट, नंतर उठली टीकेची झोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा 11 वा अवतार असल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटले आहे. अवधूत वाघ यांनी शुक्रवारी दुपारी ट्‍वीट करून नरेंद्र मोदी हे विष्‍णूचा अवतार असल्याचे म्हटले आहे. मात्र, वाघ यांच्या ट्‍वीटवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

 

भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णु चे अकरावे अवतार आहेत

— Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp)October 12, 2018

 

फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही- जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अवधूत वाघ यांच्यावर खोचक टीका केली आहे. अवधूत वाघ बरेच पक्ष फिरुन आले आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्य फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...