आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी मिळाल्यास मुलास पुन्हा परदेशात नेणार..भाजपच्या अमेरिका रिटर्न महापौरांचा उद्दामपणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अापल्या मुलास स्वीय सचिव असल्याचे दाखवून अमेरिकेच्या दौऱ्यात सोबत नेणाऱ्या नागपूरमधील भाजपच्या महापौर नंदा जिचकार यांच्यावर टीका हाेत अाहे. मात्र 'संधी मिळाल्यास मुलास पुन्हा परदेशात नेऊ', अशा शब्दांत त्यांनी अापल्या निर्णयाचे समर्थन करत उद्दामपणाचे दर्शन घडवले आहे.

 

काँग्रेसने महापौराविरोधात अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेची नोटीसही दिली. मात्र, सोमवारीच्या सर्वसाधारण सभेत हा विषयच आला नाही. उलट काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्या वर्तनाबद्धल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव सभेत मंजूर झाला. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने महापौरांच्या वर्तनाबद्धल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे निवेदन महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...