Home | Maharashtra | Mumbai | BJP MLA Ram kadam Controversial Statement On girl Video Virul

'मुलीला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार', भाजप आमदार राम कदम यांचे बेताल वक्तव्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 03:24 PM IST

घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांसंदर्भात बेताल वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

 • BJP MLA Ram kadam Controversial Statement On girl Video Virul

  मुंबई- घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांसंदर्भात बेताल वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात उपस्थित गोविंदांशी राम कदम यांनी संवाद साधला. 'मुलीला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार'; असे राम कदम यांनी गोविंदांना आश्वासन दिले. एवढेच नाही तर राम कदम यांनी गोविंदाना आपला मोबाइल क्रमांकही यावेळी दिला. विशेष म्हणजे या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होते.

  दरम्यान, राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नासाठी मुलींना पळवून आ़णार आणि तुम्हाला देणार, या वक्तव्यावरून कदम त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

  आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आरोप..

  राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात गोविंदांशी संवाद साधताना महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

  'बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन , दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे ! कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित?' असा सवाल करणारे ट्‍वीट जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्‍विटर हॅण्डलवरून केले आहे. सोबत राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचाही व्हिडिओ पोस्ट केला आहे.

  ही विरोधकांची राजकीय खेळी- राम कदम

  'माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता. ही राजकीय विरोधकांची खेळी', असल्याचे सांगत राम कदम यांनी सारवासारव केली आहे. प्रत्येक मुला आणि मुलीने आपल्या आई-वडिलांचा मान राखला पाहिजे असेच मी म्हटल्याचे राम कदम यांनी प्रसारमाध्यमाशीं बोलाताना सांगितले. त्याचबरोबर या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबद्दल मी माफी मागतो, असेही कदम म्हणाले आहे.

  विद्या चव्हाणांनी डागली तोफ..

  राम कदम हेच धंदे करतात काय, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी कदम यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे.

Trending