Home | Maharashtra | Mumbai | BJP MLA Ram Kadams Supporters Misbehave With Female Journlist Mumbai

आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांची महिला पत्रकाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 09:10 PM IST

भाजपचे आमदार राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला कार्यालयात फोन करून शिवीगाळ केल्याचा प

  • BJP MLA Ram Kadams Supporters Misbehave With Female Journlist Mumbai

    मुंबई- भाजपचे आमदार राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला कार्यालयात फोन करून शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. दरम्यान, कदम यांनी शुक्रवारीच अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या निधनाचे ट्विट करून पुन्हा वाद ओढवून घेतला होता.

    कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संबंधित वृत्तवाहिनीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात काही राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. या कार्यक्रमामुळे कदम यांचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. त्यांनी वृत्तवाहिनीच्या कार्यालयात फोन करून महिला पत्रकाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान, या प्रकारामुळे कदम यांच्यावर मुख्यमंत्री काहीही कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Trending