आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीचा गुन्हा दाखल करू नये म्हणून आमदारांनी पकडले तक्रारदाराचे पाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचे आमदार योगेश टिळेकर हे आधीच अडचणीत असताना त्यात आणखी भर पडली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांचे पाय धरत गुन्हा दाखल न करण्याची विनंती करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.     
फायबर ऑप्टिकल केबल टाकणाऱ्या कंपनीकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि कार्यकर्ता गणेश कामठे या तिघांवर कोंढवा पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

 

माहिती अधिकार कार्यकर्ते आणि ई व्हिजन टेल इन्फ्राचे व्यवस्थापक रवींद्र बऱ्हाटे यांनी ही तक्रार दिलेली आहे. येवलेवाडी डीपी प्रकरणातील व्यवहारात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची तडकाफडकी बदली झाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या गुन्ह्यात आरोपींऐवजी फिर्यादीचीच माहिती काढली जात असल्याचे समोर आले. त्यामुळे बऱ्हाटे यांनी मंगळवारी हा व्हिडिओ व्हायरल केला. १२ सप्टेंबर रोजी टिळेकरांनी बिबवेवाडीतील एका हॉटेलात भेट घेतल्याचे बऱ्हाटे म्हणाले. 

 

गैरसमज दूर करण्यासाठी भेटलो : आमदार टिळेकर
तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला तर माझ्या राजकीय जीवनाला धक्का लागेल, तुमचा गैरसमज दूर करा. खोटा गुन्हा दाखल करू नका, असे सांगण्यासाठी मी त्यांची भेट घेतली होती, असे टिळेकर यांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... काय आहे हे प्रकरण?

बातम्या आणखी आहेत...