आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राफेल\' सत्ताधारी सरकारसाठी काळ ठरतेय; भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राफेल विमान खरेदीत आता महाघोटाळा झाल्याचा संशय निर्माण होत आहे. हे प्रकरण सरकारसाठी काळ ठरते आहे, अशी टीका भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नागपुरात बोलताना केली.

 

राफेल खरेदीवर सरकारचे केवळ काही मंत्रीच उत्तरे देत आहेत. पंतप्रधान मोदी मौन बाळगून आहेत. त्यामुळे हा महाघोटाला असल्याचा संशय निर्माण होत आहे. राफेल सरकारसाठी काळ ठरू पाहते आहे, असे सांगताना सरकारने पुढे येऊन याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी सिन्हा यांनी केली. पंतप्रधान आणि सरकारची कार्यशैली दबावकारी आहे, असे नमूद करताना आता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  देखील आपल्या वेदना व्यक्त करू लागला आहे. संघाच्या वेदनांकडे तरी थोडे लक्ष ठेवायला हवे, असे सिन्हा म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...