आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा; महिलेला लग्नाचे आमिष दाखवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपचे नेते आणि मुंबई म्हाडाचे माजी अध्यक्ष मधू चव्हाण यांच्या विरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. चिपळूण येथील ५७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतही चव्हाण यांच्यावर असाच गुन्हा दाखल झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील एका शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या या महिलेने यापूर्वीही दोन वेळा मधू चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 


२००२ ते २०१७ अशा पंधरा वर्षांच्या कालावधीत चव्हाण यांनी वारंवार लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याचा महिलेचा आरोप आहे. मात्र, या तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर या महिलेने चिपळूण न्यायालयात धाव घेतली. त्यावर चिपळूण न्यायालयाने पोलिसांना तक्रारीची तातडीने दखल घेऊन चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयानेही स्थानिक न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. 

बातम्या आणखी आहेत...