आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिराचा मुद्दा सोडला नाही..भाजप- शिवसेनाची युती व्हावी, ही जनतेची अपेक्षा- रावसाहेब दानवे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- राममंदिराचा विषय भाजपने सोडला नाही. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर आगामी निवडणुका लढवणार आहे. तर, भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी, ही जनतेची अपेक्षा असल्याची भावना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी दानवे अमरावतीत आले होते. या वेळी एका पत्रकार परिषदेत दानवे म्हणाले, केंद्रात भाजपचे बहुमत असले तरी राममंदिर बांधण्यासाठी घटनात्मक तरतूद करावी लागणार आहे.

 

25 वर्षांत काँग्रेसच्या काळात झाला नाही, तेवढा विकास भाजपच्या कार्यकाळात झाला असून आगामी निवडणुकीत विकास हाच मुद्दा राहणार आहे. 25 वर्षांपासून शिवसेना व भाजपची युती आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यादरम्यान ठरलेला युतीचा फॉर्म्युला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या काळात झालेली युती असल्याने भाजप-शिवसेना एकत्र येणे अपरिहार्यता नाही. युतीत आल्यास शिवसेनेचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील 48 लोकसभा आणि 288 विधानसभा क्षेत्रांत बूथनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांसह बूथप्रमुख कामाला लागावेत म्हणून आढावा घेतला जात आहे. 27 ऑ'क्टोबरपासून दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबरला गडचिरोली व चंद्रपूर, 28 ला यवतमाळ व वर्धा, 29 ऑक्टोबरला अमरावती व रामटेक असा आढावा घेण्यात आला.

 
मंत्रिपद मिळाले नाही म्हणून शत्रुघ्न सिन्हांना वाटते हुकूमशाही  
केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही म्हणून भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा व माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांना मोदी सरकार हे लोकशाहीचे नाही, तर हुकूमशाहीचे असल्याचे वाटत आहे. शत्रुघ्न सिन्हा हे शेतकऱ्यांकरिता कधीपासून लढायला लागले, असा खोचक टोलाही दानवेंनी लगावला. तर आमदार बच्चू कडू यांनी जालना येथून लढणार असल्याचे आव्हान दिले असल्याचे विचारले असता कडू यांनाच विचारा, असा उलटा सवाल दानवेंनी केला.

बातम्या आणखी आहेत...