आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी- लातुरमधील निलंगा येेथे जवळपास दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा अहवाल समोर आला आहे. या अपघातास पायलट जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे हेलिकॉप्टर वाट चुकल्याचे समोर आले आहे.
रावसाहेब दानवे मंगळवारी परभणी दौऱ्यावर आहेत. ते विद्यापीठाला भेट देणार होते. मात्र, त्याच्या हेलिकॉप्टरने आकाशात घिरट्या मारल्या आणि ते भलत्याच ठिकाणी उतरले.
मिळालेली माहिती अशी की, रावसाहेब परभणी दौऱ्याच्या वेळी दानवे यांचे हेलिकॉप्टर विद्यापीठात लँड केले जाणार होते. परंतु, पायलटने हेलिकॉप्टर थेट पोलिस मुख्यालयाच्या आवारात नेले. अक्षांश, रेखांश न मिळाल्याने हेलिकॉप्टर आकाशात काही वेळ घिरट्या मारत होते. दरम्यान, दानवेंच्या हेलिकॉप्टरसाठी विद्यापीठात हेलिपॅड तयार करण्यात आले होते. विद्यापीठातील लोकांशी संपर्क झाल्यानंतर पायलटने हेलिकॉप्टर विद्यापीठाकडे वळवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.