आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगली बायको मिळावी म्हणून तरुणासह तिघांची विवस्र पूजा; भोंदू बाबासह दोघे अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- येथील गजबजलेल्या जळका बाजार परिसरात एका घरात पैशांचा पाऊस आणि चांगल्या वधूप्राप्तीसाठी अघोरी पूजा करण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. विवस्त्र करून पूजा केल्यानंतर बाबाने नरबळी देण्याचा सल्ला तरुणाला दिला होता. मात्र, त्या तरुणाने नरबळीची गोष्ट आपल्या आई-वडिलांच्या कानावर घातल्यामुळे भोंदू बाबाचे बिंग फुटले. या प्रकरणी बाबासह एकास पोलिसांनी अटक केली आहे. सुरूपसिंग नाईक असे या बाबाचे नाव आहे. तरुणाच्या आई-वडिलांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. 


शहरातील परेश राजेंद्र सोनार याचे लग्न होत नव्हते. त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील ढेकवद येथील बाबा सांगेल तशी पूजा केल्यास लवकर लग्न जमून चांगली बायको मिळेल, खूप धन मिळेल असा सल्ला परेशला त्याच्या मामाचा मुलगा अमोल प्रवीण सोनार याने दिला होता. त्यानंतर भोंदूबाबा सुरूपसिंग नाईक हा अमोल सोनार याच्या घरी मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता आला. त्या अाधी अमोलचे दोन नातेवाईक येऊन बसले होते. विवस्रावस्थेत पूजा केल्यानंतर बळी द्यावा लागेल, असे बाबाने सांगताच परेशची भीतीने गाळण उडाली. त्याने आपल्या आई-वडिलांना ही बाब सांगितली. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. अखेर पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिस ठाण्यात कथन केला. या प्रकरणी परेशचा नातेवाईक अमोल सोनार व बाबा सुरूपसिंग नाईक याच्या विराेधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या दोघांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. जादूटोणाविराेधी कायद्यान्वये या दोघांवर कारवाई करण्यात आली. अटकेनंतर बाबांची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. यापूर्वी किती लोकांना या बाबाने फसवले, याचा तपास पोलिस करत आहेत. 


नरबळीचा सल्ला एेकताच तरुण झाला भयभीत 
सुरुपसिंग महाराजने परेश सोनारसह तिघांकडून पूजा करून घेतली. तसेच अंगावरील कपडे काढायला लावले. चौघांनी अंगावरील कपडे काढले. संबंधित तरुणासह अर्धा तास तिघे विवस्त्र अवस्थेत बसून हाेते. त्यानंतर बाबाने प्रत्येकाच्या कानात सांगितले की, अजून मोठी पूजा करावी लागेल. त्यामुळे धनप्राप्तीही होईल. मात्र, त्यासाठी नरबळी द्यावा लागेल.अघोरी उपाय सांगताच तरुण भयभीत झाला. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो

 

बातम्या आणखी आहेत...