आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट बुडाली; महिलेसह मुलावर उपचार सुरु, मोठा अनर्थ टळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्राचे आराद्य दैवत गणपती बाप्पाला दहा दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी भक्तीमय वातावरणार निरोप देण्यात आला. सोमवारी सकाळी नऊ वाजेदरम्यान लालबागच्या राजाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर करण्‍यात आले. यावेळी एक बोट पलटली. सुदैवाने बोट पलटल्याने बुडालेल्या व्यक्तींना पाण्यातून बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

मुंबई महानगरपालिकेचे पीआरओ तानाजी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट पलटल्याने पाच जण पाण्यात पडले. या पाचही जणांचा पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या व्यक्तींची परिस्थिती गंभीर नसून त्यांना नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले.

 

यासंदर्भात माहिती देताना नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल म्हणाले की, गणपती विसर्जनादरम्यान बोट दुर्घटनेतील 4 व्यक्तींना रूग्णालयात दाखल केले. यामध्ये 1 महिला, 2 पुरुष आणि एका बालकाचा समावेश आहे. यामधील महिला आणि 5 वर्षीय लहान मुलाला श्वसनासंबंधीचा त्रास जाणवत आहे. 25 वर्षीय व्यक्तीच्या मानेला आणि 32 वर्षीय रूग्णाच्या पायाला दुखापत झाली आहे. या रूग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याशिवाय अजून एका व्यक्तीला रूग्णालयात आणण्यात आले आहे. बोट उलटण्याची दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा तपास पोलिस आणि फायर ब्रिगेडकडून केला जात आहे.

 

गृहराज्यमंत्र्यांची उपस्थिती...

मुंबईतील मानाचा गणपती समजला जाणारा मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्‍यात आले. त्या पाठोपाठ लालबागच्या राजाचेही विसर्जन झाले.  विशेष म्हणजे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची या विसर्जनाच्यावेळी खास उपस्थिती होती. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...