Home | Maharashtra | Mumbai | Bogus breast transplant surgery in Thailand, womens life saves to wockhardt hospital

अचानक वाढू लागला स्तनांचा आकार..सवलतीच्या दरात स्तन प्रत्यारोपण करणे तिला पडले महागात!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 10, 2018, 12:02 PM IST

थायलंडमध्ये महिलेचे स्तन प्रत्यारोपण न करता तिला सिलिकॉन इंजेक्शन देण्यात आले होते.

 • Bogus breast transplant surgery in Thailand, womens life saves to wockhardt hospital

  मुंबई- थायलंडमधील एका महिलेला खासगी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात स्तन प्रत्यारोपण करणे चांगलेच महागात पडले. सिलिकॉन इंजेक्शन देऊन करण्यात आलेल्या सर्जरीमुळे महिलेला जीव गमवावा लागला असता, मात्र मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये तिच्यावर वेळीच उपचार झाल्याने ती थोडक्यात बचावली.

  अचानक वाढू लागला स्तनांचा आकार...
  थायलंड येथील रहिवासी 44 वर्षीय महिलेने एका हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरा स्तन प्रत्यारोपणाची सर्जरी केल होती. 4 महिने उलटल्यानंतर तिच्या स्तनांचा आकार अचानक वाढू लागला. तसेच त्यावर लाल रंगाचे चट्टेही दिसू लागले. महिलेने तत्काळ संबंधित क्लिनिकमध्ये गेली. परंतु क्लिनिक बंद झाले असून डॉक्टरही गायब असल्याचे तिला समजले. त्यानंतर महिलेने मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेतली.

  स्तन प्रत्यारोपन न करता दिले सिलिकॉन इंजेक्शन..
  वोक्हार्ट हॉस्पिटलचे ऑनकोलॉजिस्ट डॉ. मेघल संघवी यांनी सांगितले की, महिलेवर तातडीने उपचार करण्‍यात आले. अन्यथा तिला जीव गमवावा लागला असता. थायलंडमध्ये महिलेचे स्तन प्रत्यारोपण न करता तिला सिलिकॉन इंजेक्शन देण्यात आले होते. सिलिकॉन इंजेक्शन घातक असून महिलेला कॅन्सर होण्याची शक्यता होती.

  डॉ. संघवी यांनी सांगितले की, महिलेच्या स्तनांमधील सिलिकॉनच्या लहान तुकड्यांना काढणे शक्य नव्हते. त्यामुळे तिच्या स्तनांची पुननिर्मिती करण्यात आली. त्यामुळे महिलेच्या जीवाला आता कुठलाही धोका नाही.

Trending