कॅनेडियन तरुणीला फ्लॅटवर / कॅनेडियन तरुणीला फ्लॅटवर बोलावून केले अश्लील कृत्य; बॉलिवूड अॅक्टरसह नेव्ही ऑफिसरच्या हातात बेड्या

  • पीडित तरुणीने ही बाब आपल्या बॉयफ्रेंडला सांगितली.

Dec 07,2018 05:46:00 PM IST

मुंबई- कॅनेडियन तरुणीला फ्लॅटवर बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अॅक्टरसह मर्चेंट नेव्ही ऑफिसरच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. अॅक्टर साहेब सिंह आणि मर्चेंट नेव्ही ऑफिसर अमर चौधरी या दोघांवर आपल्या फ्लॅटवर पीडित तरुणीला बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. नंतर पीडित तरुणीने ही बाब आपल्या बॉयफ्रेंडला सांगितली. त्याने याप्रकरणी बांगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार एक विदेशी तरुणी असून ती बॉयफ्रेंडसोबत मुंबईत फिरायला आली होती. वांद्र्ये येथील एका डिस्को बारमध्ये या प्रेमीयुगलाची ओळख आ‍रोपींसोबत झाली. प्रेमी युगल हॉटेल शोधत होते. परंतु आरोपींनी दोघांना त्यांच्या फ्लॅटवर थांबण्याची ऑफर केली. नंतर सगळे एकाच कारमधून मालाड येथील साहेब सिंह यांच्या फ्लॅटवर गेले. या फ्‍लॅटवर साहेब सिंह आणि अमर चौधरीने पीडित तरुणीसोबत अश्लील कृत्य केले.

साहेब आणि त्याचा मित्र अमर यान माझ्या गुप्तांगाला स्पर्श केला. एवढेच नाही तर दोघांनी माझे अंडरगार्मेंट्स उतरविण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेने दोघांना विरोध करून झालेला प्रकार आपल्या बॉयफ्रेंडला सां‍गितला. त्याने बांगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. बांगुर नगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

काय म्हणाले आरोपी...

आरोपी अॅक्टर साहेब याने कॅनेडीयन तरुणीने केलेले आरोप फेटाळले आहेत. त्याने सांगितले की, विदेशी प्रेमीयुगल फ्लॅटवर पोहोचताच त्यांनी ड्रग्जची मागणी केली. त्यांना ड्रग्ज देण्यास नकार दिल्याने दोघांनी खोटी तक्रार दाखल करुन आम्हाला अडकविले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

X