Home | Maharashtra | Mumbai | Bollywood Actress Zarine Khan has been as a prostitute, former managers against Police complaint

बॉलिवूड अॅक्ट्रेस झरीन खानला वेश्या म्हणून हिणवले..‍व्हिडिओ आला समोर, माजी मॅनेजरविरोधात तक्रार दाखल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 07:07 PM IST

अंजलीसोबत केलेला करार संपल्यानंतर तिने धमकी आणि आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याचा आरोपी इरीन हिने केला आहे.

 • Bollywood Actress Zarine Khan has been as a prostitute, former managers against Police complaint

  मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान हिला वेश्या म्हणून हिणवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी झरीन हिने माजी मॅनेजरविरोधात खार पोलिस स्टेशलमध्ये तक्रार दाखल केली आहे.

  अंजली अथ असे या महिला आरोपीचे नाव असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

  काय आहे हे प्रकरणी..?

  आरोपी महिला झरीनसाठी मॅनेजर म्हणून काम करत होती. मात्र, काही दिवसांतच व्यवस्थापनाच्या कामावरून झरीन आणि अंजलीमध्ये खटके उडत होते. यावरून अंजलीने काम सोडले. मात्र, दोघींमधील वाद विकोपाला गेला. अंजलीने भांडणात झरीन हिला वेश्या असे संबोधले. याप्रकरणी झरीन हिने खार पोलिसांत चारित्र्य हनन केल्याप्रकरणी अंजली हिच्या विरोधात तक्रार दाखल नोंदविली.

  झरीनला पाठवले धमकी आणि आक्षेपार्ह मेसेज..

  अंजलीसोबत केलेला करार संपल्यानंतर तिने धमकी आणि आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याचा आरोपी इरीन हिने केला आहे. तसेच अंजली समाजात आपल्या विषयी खोटी माहिती पसरवत असल्याचे तिने म्हटले आहे. याप्रकरणी खार पोलिस स्टेशनमध्ये अंजलीविरोधात महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह शब्द वापरणे तसेच कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Trending