आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या मेकअप आर्टिस्टवर 16 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप, शूटिंगच्या सेटवरच केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रनोटचा मेकअप आर्टिस्ट ब्रेंडन एलिस्टर डी गी याला खार पोलिसांनी अटक केली आहे. ब्रेंडनवर 16 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

 

कर्जत येथे कंगनाचा अपकमिंग मूव्हीची शूटिंग सुरु होते. ब्रेंडना याला पोलिसांनी शुटिंगच्या सेटवरच अटक केली. खार पोलिस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर संजय मोरे यांनी सांगितले की, कंगनाच्या हेअर स्टाइलिस्टला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार (पॉक्सो) अटक करण्यात आली आहे.

 

डेटिंग अॅपवर झाली होती भेट
- मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी ब्रेंडन आणि पीडित मुलाची भेट एका डेटिंग अॅपवर झाली होती.
- पोलिसांनुसार, पीडित मुलाने डेटिंग अॅपवर अकाउंट बनविल्यानंतर त्याला 30-60 वर्षांच्या अनेक पुरुषांनी सेक्सची ऑफर दिली होती.
- पीडित मुलाने 2017 मध्ये अॅप डाउनलोड केले होते. तेव्हा त्याच्यासोबत सेक्ससाठी 15 पुरुषांनी प्रस्ताव दिला होता. पीडित मुलाच्या आईने या प्रकरणी गेल्या वर्षी पोलिसांत तक्रार दिली होती.

 

पीडित मुलाच्या आईला असे समजले होते प्रकरण...
-पीडिती मुलाच्या आईला मे 2017मध्ये या प्रकरणाची भनक लागली होती. रात्री पाणी पिण्यासाठी ती उठली असता मुलाला तिने एक पुरुषासोबत अाक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. तेव्हा पीडित मुलगा डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेक पुरुषांच्या संपर्कात असल्याचे  समोर आले होते.

- हे ऐकून पीडित मुलाची आई थक्क झाली होती. तेव्हा आईने मुलाचा मोबाइल तपासला असता त्यात डेटिंग अॅप इन्स्टॉल असलेल्याचे आढळले. त्यानंतर तिने याप्रकरणी खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.
- खार पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. ब्रेंडनचे नाव समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आले असून त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

 

कोण आहे ब्रेंडन?

- ब्रेंडन हा साऊथ आफ्रिकन नागरिक आहे. मागील 10 वर्षांपासून तो सेलेब मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाइलिस्ट म्हणून काम करत आहे.

- साऊथ आफ्रिकतून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. नंतर तो मुंबई आला होता. ब्रेंडन याने इंडियातील लीडिंग मॅगझीन्स व ब्रँड्ससाठी काम केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...