आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अॅड एजन्सीत काम करायचा रणवीर सिंह, वेट्रेस होती सोनम कपूर, फिल्म्सपूर्वी हे काम करत होते 13 बॉलिवूड स्टार्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हटले जाते, की यश हे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप कष्ट करावे लागते. असेच काही अनेक सेलिब्रेटींच्या बाबतीत घडले आहे. ऐकायला थोडे विचित्र वाटते, परंतु हे सत्य आहे. प्रसिध्दी मिळवण्यापूर्वी अनेक सेलेब्स असे काम करत होते. ज्यांविषयी कुणी विचारही करू शकत नाही. यातील काही सेलिब्रिटींनी त्यांच्या करिअरची सुरुवात वेटर म्हणून तर कुणी वॉचमन म्हणून केली होती. काही सेलिब्रिटींनी सेल्समन आणि कॉपी रायटरचीसुद्धा नोकरी केली. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी बॉलिवूडचे नावाजलेले 13 सेलिब्रिटी कोणते काम करायचे, त्याची खास माहिती देत आहोत...

 

अॅड एजन्सीत काम करायचा रणवीर सिंह... 

तरुणाची गळ्यातील ताईत बनलेला आणि अलीकडेच अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत विवाहबद्ध झालेला अभिनेता रणवीर सिंह सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी एका अॅड एजन्सीत कामाला होता. मुंबईतील एका अॅड कंपनीत कॉपी रायटर या पदावर तो कार्यरत होता. त्यानंतर त्याचा दिग्दर्शक मित्र मनीष शर्माच्या सांगण्यावरुन तो अभिनय क्षेत्रात आला. त्याने 'लुटेरा' (2013), 'रामलीला' (2013), 'दिल धडकने दो' (2015), 'बाजीराव मस्तानी' (2015) सह अनेक सिनेमांत काम केले आहे. 

 

वेट्रेसचे काम करायची सोनम कपूर...

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सोनम वेट्रेसचे काम करत होती, हे कळल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र हे खरे आहे. सोनमने वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच काम करायला सुरुवात केली होती. ती खूप कमी वयापासूनच स्वतंत्रपणे जगत आहे. पंधरा वर्षांची असताना सोनम शिक्षणासाठी सिंगापूरला गेली होती. तेथे तिला पॉकेटमनीसाठी घरुन खूप पैसे मिळत नव्हते. म्हणून सोनमने सिंगापूरमध्ये एका रेस्तरॉमध्ये वेट्रेस म्हणून काम करायला सुरुवात केली. ही गोष्ट सोनमने स्वतः सिमी गरेवालच्या 'सिमी सेलेक्ट्स इंडियाज मोस्ट डिजायरेबल' या चॅट शोमध्ये सांगितली होती. सोनमला आजही महागडे आणि ब्राण्डेड कपडे खरेदी करायला आवडतात. मात्र यासाठी ती तिच्या आईवडिलांकडून पैसे घेत नाही.

 

एक नजर टाकुया, अशाच आणखी काही बॉलिवूड स्टार्सवर जे सिनेसृष्टीत येण्यापूर्वी वेगळे आयुष्य जगले...

 

बातम्या आणखी आहेत...