आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1971च्या युद्धाच्या विजयाचे ‘हीरो’ मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांचे निधन, ‘बॉर्डर’मध्ये सनीने साकारली होती भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड- पाकिस्तानविरुद्धच्या 1971मध्ये झालेल्या युद्धात भारताने विजय मिळवला. या विजयात भारतीय जवानांनी जे शौर्य गाजवले त्यात मोलाचा वाटा असलेले मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांचे शनिवारी निधन झाले. या युद्धातील हीरो म्हणून ओळखले जाणारे कुलदीपसिंग यांच्यावरच ‘बॉर्डर’ हा गाजलेला चित्रपट बेतलेला होता. यात कुलदीपसिंग यांची भूमिका सनी देओलने साकारली होती. या पराक्रमाबद्दल मेजर कुलदीपसिंग यांना महावीर चक्र सन्मानाने गौरवण्यात आले होते.

 

कुलदीपसिंग यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1940 ला शीख कुटुंबात झाला होता. पंजाबमध्ये वास्तव्यास असलेले त्यांचे कुटुंब नंतर बालाचौरमधील चांदपूरमध्ये स्थायिक झाले. 1962 मध्ये होशियारपूर गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवी संपादन केल्यावर ते भारतीय लष्करात दाखल झाले. 1963 मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या पंजाब रेजिमेंट 23व्या बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली.

 

1965 च्या युद्धात सहभाग
1965 मध्ये झालेल्या पाकविरुद्धच्या युद्धातही त्यांनी कामगिरी केली होती. या युद्धानंतर जवळपास वर्षभर ते इजिप्तमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेवर होते. पाकिस्तानने लोंगेवालमध्ये हल्ला केला कुलदीपसिंग मेजर पदावर होते.

 

लोंगोवाल चौकीवर नेतृत्व
1971 मध्ये भारत-पाकदरमयानचे युद्ध संपण्याच्या टप्प्यात होते. यादरम्यान पाकची एक मोठी सैन्य तुकडी लोंगोवाल चौकीच्या दिशेने येत असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली. या वेळी लोंगोवाल चौकीवर तैनात तुकडीचे नेतृत्व कुलदीपसिंग यांच्याकडे होते.

 

120 जवानांवर 2000 शत्रूसैन्याशी लढा
लोंगोवाल चौकीवर पाकने हल्ला केला तेव्हा या चौकीवर 120 जवान गस्तीवर होते. या सैनिकांच्या बळावर पाकच्या 2000 सैनिकांशी लढा देऊन चौकीचे रक्षण करण्याचे आव्हान कुलदीपसिंग यांच्यासमोर होते. तरी निडरपणे या जवानांनी पाकचा हा हल्ला शर्थीने परतावून लावला.

 

5 डिसेंबरचा दिवस विजयाचा...
लोंगोवाल चौकीवर ताबा मिळवून रामगढहून थेट जैसलमेरवर धडक मारण्याचा पाकिस्तानचा डाव होता. मात्र, कुलदीपसिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडीने पाकच्या 2000 जवानांना रोखून धरले.

 

5 डिसेंबर 1971 च्या पहाटे भारतीय जवानांच्या मदतीला हवाईदल आले आणि विमानांनी पाकचे रणगाडे उद्ध्वस्त केले. पाकच्या सैनिकांना माघार घ्यावी लागली.

 

6 डिसेंबरला भारतीय हवाई दलाची हंटर विमाने पाकवर अक्षरशः तुटून पडली. यात पाकचे 34 रणगाडे उद्ध्वस्त झाले. सुमारे 500 जवान जखमी झाले, तर 200 जवानांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...