Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Brother Kill His Brother in Sonpeth, Parbhani

म्हणून भावाने दोन मुलांच्या मदतीने केला सख्ख्या भावाची हत्या; आई व मुलीलाही केले गंभीर जखमी

प्रतिनिधी | Update - Oct 23, 2018, 08:14 PM IST

नागनाथची पत्नी छाया व मुलगी भांडण सोडविण्यास गेली असता त्यांनाही या तिघांनी जबर मारहाण केली

  • Brother Kill His Brother in Sonpeth, Parbhani
    परभणी- जावयाला घरगुती कार्यक्रमास का बोलावले या कारणावरून भावाने आपल्या दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाचा कु-हाडीचे वार करीत खून केला. यात भांडणे सोडविण्यास आलेल्या भावाच्या पत्नी व मुलीसही जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले.सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील डोंबाडी तांडा वसाहतीवर सोमवारी (दि.22) रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.


    डोबाडीतांडा वसाहतीत नागनाथ सखाराम भोसले यांनी सोमवारी सायंकाळी त्यांचा जावाई धीरज पवार यास घरगुती कार्यक्रमानिमित्त बोलावले होते. नागनाथचा भाऊ नायल सखाराम भोसले, त्यांचा मुलगा कन्हैया नायल भोसले व प्रकाश नायल भोसले यांचा जावाई धीरज पवारशी पूर्वीचा वाद होता. याच वादातून या तिघांनी नागनाथ भोसले यास जावयाला कार्यक्रमास का बोलावले, अशी विचारणा करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी नागनाथची पत्नी छाया व मुलगी भांडण सोडविण्यास गेली असता त्यांनाही या तिघांनी जबर मारहाण केली. नागनाथ यांच्यावर कु-हाडीने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी छाया व मुलगी या दोघीही या मारहाणीत गंभीर जखमी झाल्या. त्याचवेळी या बापलेकांनी धमक्या देत घटनास्थळावरून पळ काढला. जखमी झालेल्या छाया व त्यांच्या मुलीस तातडीने अंबोजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

    दरम्यान, नागनाथची पत्नी छाया भोसले (वय- 48) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 23) नायल भोसले सह त्याचे मुले कन्हैया व प्रकाश या दोघां विरूध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला. अधिक तपास सोनपेठचे पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ हे करीत आहेत.

Trending