आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्खा चुलत भाऊ निघाला पक्का वैरी...बुलडाण्यात भावानेच टाकले शेतकर्‍याच्या विहिरीत विष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलढाणा- सख्खा चुलत भाऊ पक्का वैरी निघाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात घडली आहे. भानापूर परिसरातील एका शेतकर्‍याच्या शेतातील विहिरीत त्याच्या चुलत भावाने विष टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विहिरीतील पाणी वापरण्याआधी हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. परिसरात दुष्काळ असताना विहिरीतील पाणी विषारी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, सुलतानपूर येथील शेतकरी गजानन मारोती राजगुरू यांची भानापूर शिवारात शेती आहे. राजगुरु हे आपल्या कुटुंबासोबत शेतातच राहतात. राजकुमार संजाबराव राजगुरू याने शेतातील विहिरीत विष टाकल्याने पाणी लालसर झाले आहे. तसेच विह‍िरीतून उग्र वास येत आहे.  विहिरीचे पाणी गजानन राजगुरू यांचे कुटुंबिय पिण्यासाठी वापरते. मात्र, पाणी वापरण्याआधी हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

 

याप्रकरणी गजानन राजगुरू यांनी मेहकर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राजकुमार संजाबराव राजगुरू याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...