आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहेरी अपघातात दाेन खासगी बसेस पेटल्या; एका चालकाचा मृत्यू; २५ प्रवासी जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन बसेसचा शनिवारी रात्री विचित्र अपघात झाला. अपघातानंतर दाेन बसेस पेटल्या, त्यात एका बसचालकाचा हाेरपळून मृत्यू झाला. तर दुसरा अत्यवस्थ अाहे. यात २५ प्रवासी जखमी झाले अाहेत. 


नाशिक जिल्ह्यातील मालेगाव- मनमाड राेडवरील चंदनपुरी शिवारातील वळणावर मनमाडहून मालेगावकडे जाणाऱ्या पवनहंस ट्रॅव्हल्सच्या बसने समाेरून येणाऱ्या अजय ट्रॅव्हल्सला धडक दिली. या वेळी पाठीमागून येणारी अाशू रिचा ट्रॅव्हल्स ही अजय ट्रॅव्हल्सवर अादळली. यात शाॅर्टसर्किट झाल्याने पवनहंसच्या बसने पेट घेतला. या अागीच्या विळख्यात बसच्या पुढील भागात अडकल्याने चालक निहाल रफिक शेख याचा हाेरपळून मृत्यू झाला, तर अजय ट्रॅव्हलचा बसचालक गंभीर जखमी झाला अाहे. पाेलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी बसेसची अाग विझवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ३ तास ठप्प झाली. किल्ला पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...