आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट केल्याने दिव्या स्पंदना यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याने काँग्रेसच्या माजी खासदार आणि काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या संयोजिका दिव्या स्पंदना यांच्या विरोधात गोमतीनगर पोलिस स्टेशनला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. लखनऊचे वकील सैयद रिजवान अहमद यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी स्पंदना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

रिजवान अहमद यानी 'एएनआय'ला सांगितले की, दिव्या स्पंदना यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले ट्वीट आक्षेपार्ह होते. पंतप्रधान मोदी हे देशाचे प्रतिनिधीत्त्व करत आहेत. दिव्या स्पंदना यांचे ट्वीट हे राष्ट्रासाठी दुर्भाग्यपूर्ण असून अपमानजनक आहे. रिजवान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिव्या यांच्या विरोधात देशद्रोह आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेल या प्रकरणी तपास करत आहे.

 

दिव्या यांनी सोमवारी पंतप्रधानांविरोधात ट्वीट केले होते. यावर अनेक लोकांनी ट्रोल केले होते.

बातम्या आणखी आहेत...