आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: आता US पत्रकाराने केला एमजे अकबर यांच्यावर गंभीर आरोप..जबरदस्तीने चुंबन घेतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माजी पत्रकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील परराष्‍ट्र राज्य मंत्री एमजे अकबर यांच्या मी टू (#Metoo) कॅम्पेनच्या माध्यमातून अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. आता अमेरिकेतील सीएनएनच्या एका महिला पत्रकाराने अकबर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जबरदस्तीने पकडून चुंबन घेतले होते, असे या महिला पत्रकाराने म्हटले आहे.

 

माजीली डी प्यु कॅम्प असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. तिने हफिंगटॉन पोस्टला ईमेल करून सांग‍ितले की, '2007 मध्ये ती प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम करत होते. तेव्हा एम.जे.अकबर हे वृत्तपत्राचे संपादक होते. त्यांनी आपला लैंगिक सुखासाठी छळ केला होता. तेव्हा ती 18 वर्षांची होती. एशियन एज न्यूजपेपरमध्ये ती इंटर्न म्हणून काम करत होती. ही घटना इंटर्नशिपच्या शेवटच्या दिवशी घडली. मी आभार मानण्यासाठी त्याच्या कॅबिनमध्ये गेले होते. मी हात पुढे केला असत अकबर यांनी मला जवळ ओढले आणि जबरदस्तीन चुंबन घेतले होते.

 

दरम्यान, गेल्या 3 दिवसांत नऊ महिलांनी केंद्रीय मंत्री अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. बुधवारी एका इंग्रजी वर्तमानपत्रातील स्थानिक संपादक सुपर्णा शर्मा यांनी आरोप केला की, 1990 मध्ये वृत्तपत्राच्या सुरुवातीच्या काळात अकबर यांनी त्यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले. त्या वेळी सुपर्णा या अकबर यांच्या टीमची सदस्य होत्या. यापूर्वी प्रिया रमाणी, शुमा राहा, गजाला वहाबसह इतर महिलांनी एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे अकबर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

 

मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पत्रकारांनी याबाबत विचारले मात्र, त्यांनी बोलण्यास नकार दिला. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी मात्र बुधवारी यावर भाष्य करत अशी प्रकरणे गांभीर्याने घ्यायला हवीत, असे परखड मत व्यक्त केले. दरम्यान, काँग्रेसचे नेते जयपाल रेड्डी यांनी अकबर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...