आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ म्हणाले...राम मंदिराऐवजी उद्धव यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर लक्ष केंद्रित करावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेचा देव म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिराऐवजी फक्त बाळासाहेबांच्या स्मारकावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

 

नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना ‘तुम्हाला जमत नसेल, तर राम मंदिर आम्ही बांधू’ असे आव्हान दिले होते. तोच धागा पकडून भुजबळांनी उद्धव ठाकरेंना हा टोला लगावला.   

 
मुंबईतील वांद्रे परिसरातील एमईटी या संस्थेत आयोजित केलेल्या विद्यार्थी पालक मेळाव्यात बोलताना भुजबळांनी काही राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले. ते म्हणाले, राम मंदिराच्या बांधणीसाठी उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असल्याचे ऐकतो आहे. अयोध्येसाठी त्यांना शुभेच्छा आहेत, मात्र तत्पूर्वी शिवसेनेच्या देवाचे म्हणजे बाळासाहेबांचे स्मारक त्यांनी उभारावे. याच मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, विकासाचा मुद्दा आता अंगाशी आल्याने राम मंदिराचा मुद्दा पुढे येत आहे. मात्र राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना, जर त्या मुद्द्यावरून राजकारण होत असेल तर मग न्यायदेवतेवर सत्ताधारी पक्षाचा विश्वास नाही असे समजावे लागेल, असेही ते म्हणाले. शिवाय राम मंदिर बांधणे जर सत्ताधारी पक्षाला शक्य असेल, तर मग गेल्या चार वर्षांत ते का नाही बांधले, असा खोचक सवालही त्यांनी केला. सत्तेत राहून सरकारवर टीका करणे हा शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे. सत्तेत राहून त्यांनी विरोधकांची जागा घेऊ नये. आणि विरोध करायचाच असेल तर सत्ता सोडून थेट मैदानात यावे, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला.

बातम्या आणखी आहेत...