आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या जवानांची घुसखोरी..20 दिवसांपूर्वी अरुणाचलमध्ये ठोकले होते तंबू; आता 2 हेलिकॉप्टर लद्दाखमध्ये घुसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लद्दाख- चीनने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचे दोन हेलिकॉप्टर  27 सप्टेंबरला जम्मू-काश्मीरला लागून असलेल्या लद्दाखमध्ये घुसखोरी करून तब्बल 10 मिनिटे भारतीय वायुसेनेच्या हद्दीत थांबले होते.


भारत-तिबेटीयन सीमा पोलिसांनी याप्रकरणी आपला अहवाल सादर केला आहे. ट्रिंग हाइट भारतीय रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची असून या परिसरात दौलत बेग ओल्डी एअरफील्ड देखील आहे. चीनने वारंवार या भागात घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. 30 सप्टेंबर रोजी एका पाकिस्तानी हेलिकॉप्टर देखील भारतीय हद्दीत आले होते.


- चीनच्या जवानांनी 20 दिवसांपूर्वीची अरुणाचल प्रदेशात असलेल्या दिवंग घाटीत जाऊन तंबू ठोकले होते. परंतु परिसरातील रहिवाशांनी तात्काळ याची माहिती भारतीय जवानांना दिली होती. भारतीय जवान सीमेवर पोहोचताच चीनचे जवान माघारी परतले होते. आम्ही घुसखोरी केली नसून सीमारेषेवरच जवान पेट्रोलिंग करत होते, असे चीन आर्मीने म्हटले आहे.


बाराहोती परिसरात तब्बल 4 किलोमीटर अंतरावर चिनी जवानांनी केली होती घुसखोरी...

चीनने 6, 14, आणि 15 ऑगस्ट रोजी उत्तराखंडातील चमेली जिल्ह्यातील बारहोतीमध्ये घुसखोरी केली होती. त्यावेळी चीनचे जवात तब्बल 4 किलोमीटर आता आले होते.


बारहोती  भारत- चीन सीमेजवळचा असा भाग आहे जेथे आयटीबीपीचे जवान विनाहत्यार पेट्रॉलिंग करत असतात.  1958 मध्ये भारत आणि चीनने बारहोतीच्या 80 किलोमीटरच्या परिसराला विवादित क्षेत्र म्हणून घोषित करून येथे पुन्हा जवान पाठवणार नाहीत, असा करार  झाला होता. पुन्हा 2000 साली असाच एक करार झाला होता. आयटीपीबी विनाहत्यार असेल व सैनिक वर्दीविना असतील उत्तराखंडमध्ये बारहोती व्यतिरिक्त अशा दोन जवानांच्या तुकड्या हिमाचलम प्रदेशाच्या शिपीक आणि उत्तरप्रदेशच्या कौरीलमध्ये आहेत.


पाकिस्तानने देखील केली होती या आधी अशी घुसखोरी

30 सप्टेंबर रोजी दुपारी 12:10 च्या सुमारास पुंछमध्ये एलओसी जवळ पाकिस्तानचे एका हेलिकॉप्टरने भारतीय वायुसेनेच्या हद्दीत 700 मीटर अंतरावर घुसखोरी केली होती. भारतीय सुरक्षा जवानांनी फायरिंग केली. हेलिकॉप्टरमध्ये पाक व्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारूक हैदर खान हे होते. एका शोकसभेसाठी जाण्यासाठी त्यांनी पीओकेच्या तितोरी भागात जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केल्याची माहिती पाकच्या सुत्रांनी दिली होती. परंतु हेलिकॉप्टर पीओकेमधील कहूटा येथेच उतरले होते.


डोकलाममध्ये तब्बल 73 दिवस समोरासमोर होती दोन्ही देशाचे सैन्य

जून 2016 मध्ये भारत आणि चीनचे सैन्य डोकलाममध्ये समोरासमोर आले होते. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी भारताने चिनी सैनिकांना रास्ता बनवण्यास रोखले होते. त्यानंतर भारताने कूटनीती वापरून हा वाद मिटविण्यात आला होता.   


भारताच्या नजरेत एलएसीच अधिकृत सीमा :

भारत आणि चीनमध्ये लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) चार हजार किलोमीटर लांब आहे. भारत यालाच दोन्ही देशांतील अधिकृत सीमा समजतो. परंतु चीनचा याला स्पष्ट नकार आहे. एलएसी पार करण्याच्या मुद्यावर यावर्षीच्या सुरवातीला लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी सांगितले होते की, दोन्ही देश सीमांना वेगवेगळे मनात आहेत. परंतु भारत आणि चीन यांच्याकडे अशा वादांवर तोडगा काढण्याचे तंत्र आहे.

बातम्या आणखी आहेत...