आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- सोमवारी मुंबईत झालेल्या सर्वात मोठ्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झालीत. राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस जिमखाना स्मारकावर जाऊन शहीद झालेले पोलिस आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहीद पोलिस अधिकार्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 10 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सीएसटीएम, नरीमन हाउस, कामा हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह अनेक जवान शहिद झाले होते. 26/11च्या हल्ल्यात शहिद झालेल्या लोकांच्या स्मृतिपित्यर्थ पोलिस जिमखाना येथे स्मारक उभारण्यात आले आहे.
मुंबईवरील 26/11चा हल्ला हा मानवतेवरील हल्ला- मुख्यमंत्री
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला हल्ला हा फक्त देशावर किंवा समाजावर झालेला नव्हता, तर तो मानवतेवर झालेला हल्ला होता. मानवतेच्या इतिहासातील हा एक काळा दिवस होता. दहशतवादाविरुद्ध जगातील सर्व देश आणि सर्व समूहांनी मिळून एकत्र लढा देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिस आणि जवानांना तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना हॉटेल ताज येथील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर, जपानचे केंजी हिरामत्सू, इस्रायलचे जनरल याकोब, ब्राझीलच्या रोझीमार सिल्वासुझाने आदी उपस्थित होते.
नरीमन हाऊसमध्ये संग्रहालय..
26 नोव्हेंबर 2008 रोजी नरिमन हाऊसवरही पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. नरिमन हाऊसमध्ये संग्राहलय बनविण्यात येणार आहे. नरीमन हाऊसच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर संपूर्ण अंधार असेल. या अंधारात हल्ल्याच्या स्थितिचे चित्र दाखविण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.