आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरे महारोजगार...मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना- देवेंद्र फडणवीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरे महारोजगारमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद..

नाशिक जिल्हासह, धुळे, नंदुरबार, अहमदनगर युवक युवतींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

 

ओझर- निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने शनिवारी ओझर येथील कम्युनिटी हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये नाशिक जिल्हासह, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यातील युवक-युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला.

 

या मेळाव्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जामार्फत 9000 हजार व ऑफलाइन 5500 विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जाच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून विद्यार्थी उपस्थित झाले होते. जे विद्यार्थी या मेळाव्यात उपस्थित राहू शकले नाही त्यांना येत्या 1 वर्षभरात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांनी डी. सी.आय मध्ये येत्या 6 ऑक्टोबर पर्यंत इच्छुकांनी अर्ज आणून द्यावे असे व्यवस्थापणाकडून सांगितले आहे.

 

फडणवीस म्हणाले, उद्योग क्षेत्राला मनुष्यबळ देण्यासाठी तसेच रोजगार निर्मिती करण्यासाठी उद्योग क्षेत्र सेतूचे काम करते.त्यासाठी रोजगार मेळाव्याचे काम उल्लेखनीय आहे. बदलत्या काळात आता कौशल्याचा विकास होणे खूप महत्वाचे आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच देशात उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून मागील सहा महिन्यांच्या सर्व्हेत आठ लाख बेरोजगारांना रोजगार निर्माण झाले आहेत असे त्यांनी सांगितले.

 

ते म्हणाले, मेक इन महाराष्ट्र, मग्नेटीक महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यासाठी अनेक करार करण्यात आले. नवनवीन उद्योग स्थापन होऊन रोजगाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. औद्योगिकीकरण मध्ये नाशिक महत्वाचे असल्याने समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून मोठा विकास घडून येणार आहे. यांमुळे भविष्यात मुंबई पुणे बरोबरच नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण होतील.

 

फडणवीस म्हणाले, कृषी क्षेत्राच्या माध्यमातून पुणे पाठोपाठ नाशिक देखील निर्यात करण्यामध्ये अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक 12 हजार कोटीवरून 17 हजार कोटींवर नेण्यात आली. ड्रायपोर्टच्या माध्यमातून थेट निर्यात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक मेकइन महाराष्ट्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीला राज्यात मोठ्या प्रमाणात गेल्या चार वर्षात आकर्षित करण्यात आले असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.ओझर कम्युनिटी हॉल येथील उद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकाराने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा दरम्यान ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, देवयानी फरांदे, राहुल आहेर, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, पोलिस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.यावेळी युवासेना पदाधिकारी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...