सुधीर मुनगंटीवार स्वत: / सुधीर मुनगंटीवार स्वत: बंदूक घेऊन 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते, राजीनामा मागणे चुकीचे- मुख्यमंत्री

दिव्य मराठी वेब टीम

Nov 06,2018 05:52:00 PM IST

उस्मानाबाद- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते. वाघीण मृत्यू प्रकरणात त्यांचा यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे.

मुख्‍यमंत्र्यांनी मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर उठलेल्या वादंगावर प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी आपण मनेका गांधी यांच्याशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगलात अवनी वाघिणीला कथितरित्या ठार मारण्यात आले. राज्य शासनाच्या निर्णयानंतर वाघिणीला गोळ्या घालण्यात आल्यावरून भाजपच्या मंत्र्यांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.

X
COMMENT