आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील; मुख्यमंत्र्यांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवादी संबंधांप्रकरणी अटकेतील 5 सामाजिक कार्यकर्त्यांची नजरकैद सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी आणखी चार आठवड्यांनी वाढवली आहे. त्यात वरवर राव, अरुण परेरा, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, आणि  वेरनन गोंजल्विस यांचा समावेश आहे. याचिकेत आरोपींच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती. सध्या ते सर्व आपापल्या घरातच नजरकैदेत आहेत. पुणे पोलिसांनी 28 ऑगस्ट रोजी त्यांना अटक केली होती.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील.  समाजात द्वेष पसरवणार्‍यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हा देशाचा सर्वात मोठा विजय आहे. आरोपीचे समर्थन करणे म्हणजे देशाच्या शत्रुंना साध देण्यासारखे आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. कोर्टाचे मनःपूर्वक आभार मानतो.'

 

पुणे पोलिसांनी भूमिका योग्य- सुप्रीम कोर्ट

या प्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टात सर्व पुरावे सादर केले होते. आरोपी मागील काही वर्षापासून हे षडयंत्र रचत होते, हे पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या पुराव्यातून स्पष्ट झाले दआहे. आरोपी माओवाद्यांना पाठिंबा देत होते.

बातम्या आणखी आहेत...