आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांकडून पत्नीच्या \'त्या\' सेल्फीचे समर्थन..नेटीझन्सला सुनावले; जे 38-40च्या वयात करणार ते 56च्या वयात करणार काय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांचा आंग्रिया क्रुझवर काढलेल्या सेल्फीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अमृता यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर चहुबाजुने टीका झाली. या सेल्फीवादावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'माझी पत्नी बांधील नाही, तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे'. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अमृता यांच्या सेल्फीवर ट्रोल करणाऱ्या नेटीझन्सला सुनावले आहे.

 

देवेद्र फडणवीस यांनी सांगितले की, सेल्फीची हौस कोणाला नाही. महाराष्ट्राला तरुण मुख्यमंत्री मिळाला आहे. तसेच यापूर्वी तरुण मुख्यमंत्र्यांची तरुण पत्नी महाराष्ट्रातील जनतेने पाहिली नाही. मात्र, हलक्या विचारांचे लोक माझ्या पत्नीला ट्रोल करत आहेत. माझी पत्नी बांधील नाही. ती वैयक्तिक विचार ठेवते, ती तिचे काम करते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जे तुम्ही 38-40 वर्षांच्या तरुण वयात करणार ते, 56 वर्षांच्या वयात करणार नाहीत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मिसेस सीएम अमृता फडणवीस यांच्या सेल्फीचे समर्थन केले. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर उपस्थितांकडून टाळ्या वाजवून चांगलीच दाद मिळाली.

 

मिसेस सीएम काय म्हणाल्या..

'मी एका क्रूझवर होते. मी ज्या जागी बसली होती ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढायला गेले नव्हते. मी बऱ्याच दिवसांनी शुद्ध हवेचा अनुभव घेत होते.'

- अमृता फडणवीस

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मिसेस  सीएम अमृता फडणवीस यांच्या सेल्फीचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...