आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपी केल्याने विद्यार्थिनी डीबार..नैराश्यातून केला आत्महत्येचा प्रयत्न, यावलमधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- कॉपी करताना आढळल्याने डीबार झालेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना यावलच्या आदिवासी मुलींच्या वसतीगृहात मंगळवारी सांयकाळी घडली. विद्यार्थिनीचे नाव हेमा गणपत पावरा (वय-22, रा. धडगाव, जि.नंदूरबार) असे आहे. विद्यार्थिनीवर आधी खासगी व नंतर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्‍यात आले. नंतर तिला जळगावला हलविण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.


मिळालेली माहिती अशी की, हेमा पावरा ही येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी.ए.च्या तृतिय वर्षाची विद्यार्थिनी आहे.  मंगळवारी तिचा हिंदी विषयाची परीक्षा होती. दुपारी 3 ते 5 या वेळेत ती पेपर सोडवताना कॉपी करताना आढळून आली. पर्यवेक्षकांनी तिच्यावर कारवाई करीत तिला डीबार करण्यात आले. त्यानंतर ती वसतीगृहात परतली. कारवाईमुळे आलेल्या नैराश्यातून तिने एकाच वेळी विविध प्रकारच्या तब्बल आठ गोळ्या सेवन केल्या. नंतर तिला अस्वस्थ वाटत असल्याने हा प्रकार उघडीस आला. तिला तत्काळ शहरातील डॉ.प्रवीण पाटील यांच्या खासगी रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभी असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. नंतर तिला ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. डॉ. उमेश कवडीवाले, सरला परदेशी यांनी तिच्यावर प्रथमोचार करून तिला जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार्थ हलवण्यात आले आहे.


प्राचार्य रूग्णालयात...

घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. एफ. एन. महाजन, डॉ. प्रा. प्रल्हाद पावरा, प्रा. अर्जुन पाटील रुग्णालयात पोहोचले. आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी या प्रकाराची माहिती घेत कार्यालयातील प्रतिनिधींना रुग्णालयात पाठवले तर जळगावला या विद्यार्थिनीसोबत वसतीगृहाची अधिक्षक विशाखा बोरकर यांना पाठवण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...