आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी, मुलीची हत्या करून गुजरातमधील व्यापारीने केली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिले \'शेर अलविदा कह रहा है\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- नरोडा परिसरात मंगळवारी रात्री उशीरा कॉस्मेटिक व्यापारीने पत्नी कविता (45) आणि 16 वर्षाची मुलगी श्रीन हिची हत्या करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. कुणाल त्रिवेदी (50) असे आत्महत्या केलेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. कुणाल त्रिवेदी यांनी 75 वर्षीय आईलाही विष दिले होते. मात्र, त्यांच्यावर विषाचा परिणाम न झाल्याने आई थोडक्यात बचावल्या.

 

3 पानांच्या सुसाइड नोटमध्ये कुणाल त्रिवेदी यांनी केला धक्कादायक खुलासा...
बुधवारी सकाळी एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळल्याचे खळबळ उडाली आहे. सामूहिक हत्याकांडामागे मोठे आर्थिक कारण असावे, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, 3 पानांच्या सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासे करण्‍यात आले आहे. कुणाल त्रिवेदी यांनी ही सुसाइड नोट आपल्या आईला लिहिली आहे. 

 

कोणीच फोन उचलला नाही.. आला संशंय

नरोडा परिसरातील हरिदर्शन चार रस्ता भागात कुणाल, कविता आणि 16 वर्षीय श्रीन, आई जयश्रीबेन एका भाड्याच्या घरात राहात होते. कुणाल यांच्यासह घरातील इतर सदस्यापैकी एकही जण फोन उचलत नाही, त्यामुळे नातेवाइकांनी संशंय व्यक्त केला. नरोडा पोलिसांना संपर्क करण्‍यात आला. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. घरात कुणाल फासावर लटकलेल्या अवस्थेत तर कविता आणि श्रीनचा मृतदेह बेडरूममध्ये तरी जयश्रीबेन हॉलमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे

 

काय आहे कुणाल त्रिवेदी यांच्या सुसाइड नोटमध्ये?

'मम्मी! मी तुला अनेकदा काळ्या जादूबाबत सांगितले होते. परंतु तू त्यावर विश्वास ठेवला नाही.  तू मला कधी समजून घेतले नाही. सर्व जग मला दारुड्या समजते. परंतु मी नशेच्या आहारी का गेलो, हे जाणून घेण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही. जण माझ्या भावना तू समजून घेतल्या असत्या तर मी या मार्गाला कधीच गेलो नसतो. जीवनात  मी कोणलाच घाबरलो नाही. कुणालच्या डिक्शनरीत 'आत्महत्या' सारखा शब्द नव्हता. मी तुला अनेकदा काळ्या जादूविषयी सांगितले. मात्र, तू त्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे मला दारुच्या आहारी जावे लागले.'

 

बिझनेस करण्‍यासाठी MP वाल्याने मला 14,55,000 रुपये दिले होते. मी काही कर्जबाजारी नाही.  मी 6 लाख रुपयांचा माल विकला होता. कोणीही तुझ्याकडे हजार रुपयांचा दावा करू शकत नाही. मी काही छंद म्हणून दारु पिण्यास सुरुवात केली नव्हती. माझ्यातील दुर्बलपणावर काळ्या जादूने मात केली होती.'

 

काळी जादू सहज पिछा सोडत नाहीत...

जिज्ञेश भाई! आता तुमची जबाबदारी वाढली आहे. 'शेर अलविदा कह रहा है'. जिज्ञेश कुमार, तुषार भाई तुम्ही दोघांनी माझी स्थिती पाहिली आहे. मात्र, तुम्हीही काही करू शकले नाही. कुलदेवी माझे रक्षण करेल, असे कविताला वाटत होते. परंतु तिला काय माहीत की, काळी जादू सहज पिछा सोडत नाही.'

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...