आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाईस रेकॉर्ड हिसकावून तक्रारदाराला विवस्र करून बेदम मारहाण..अकोला पोलिसांचा प्रताप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- तक्रारदाराकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)पडताळणीसाठी लावलेले व्हॉइस रेकॉर्ड लुटणे, त्यातील चिप बदलून दुसरी लावणे आणि लाच मागणे या कलमांवरून सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचा पोलिस उपनिरीक्षक, त्याचा रायटर व एका पोलिस कर्मचार्‍याविरोधात एसीबीने मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.  पोलिस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, रायटर सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश शेंडे अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, कारंजा येथील तक्रारदाराला ऑक्टोबर महिन्यात एक जुना मोबाईल सापडला. त्याने तो दुरुस्त करून वापरात आणला. या मोबाइलसंदर्भात तक्रार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल होती. मोबाइल लोकेशन कारंजा येथे दिसत होते. त्यावरून शेंडे याने तक्ररारदाराला फोन करून बोलावून घेतले. तक्रार दडपण्यासाठी पीएसआय म्हस्के यांच्या मार्फत 10 हजार रुपये लाचेची मागणी केली.

 

तक्रारदाराच्या तक्रारीवरून एसीबीने सापळा लावल्याचा संशय पीएसआय म्हस्के व शेंडे याला आला. दोघांनाही तक्ररदारास विवस्र करून बेदम मारहाण केली. तसेच त्याच्याजवळील व्हाईस रेकॉर्ड हिसकून मारहाण केली. तरीही तक्रारदारांनी लाचखोर पोलिसांना भीक घातली नाही. त्याने झालेला सर्व प्रकार एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितला. तक्रारदाराच्या फिर्यादीवरून सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एसीबीने अद्याप कोणालाही अटक केली नाही. या घटनेमुळे पोलिसांची दादागिरी वाढल्याचे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...