आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याची बळजबरी करणाऱ्या मुलांवर गुन्हा, औरंगाबादेतील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुमच्या नावावर असलेले घर आमच्या नावावर करा
  • पोटच्या मुलांनी दिली जीवे मारण्याची धमकी

औरंगाबाद- तुमच्या नावावर असलेले घर आमच्या नावावर करून तुम्ही वृद्धाश्रमात निघून जा, नसता तुम्हाला जीवे मारू’ अशी धमकी देत दोन मुलांनी आपल्या जन्मदात्या माता पित्यांना घराबाहेर हकलून दिल्याचा धक्कादाय प्रकार सिडको एन 7 परिसरातील गेडॉर कॉलनीत घडला़ या प्रकरणी दोन मुलांसह सुनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमृतराव धनसिंग फतपुरे हे 65 वर्षीय जेष्ठ नागरीक गेडॉर कॉलनी, एन 7 भागात (रा. गुप्ता किराणाच्या मागे) पत्नी, दोन मुले आणि दोन सुनांसोबत रहातात. फतपुरे यांची गावाकडे शेती आहे तर त्यांच्या पत्नी ह्या पेन्शनर आहेत़ गुरूवारी 29 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फतपुरे यांचे मुलगा विनोद अमृतराव फतपुरे आणि धिरज अमृतराव फतपुरे व दोन्ही सुना यांनी संपत्तीवरून वाद घालत अमृतराव फतपुरे यांना आणि त्यांच्या पत्नीला तुमची सर्व संपत्ती आणि राहते घर आमच्या नावावर करून द्या़ शिवाय आईला मिळणारी पेन्शन देखील आमच्या हातात देत जा अशी मागणी करत वाद घातला़.  गेल्या अनेक वर्षांपासून या वृध्द दाम्त्यांना त्यांची दोन्ही मुले आणि सुना संपत्ती नावावार करण्यासाठी त्रास देत होते. गुरूवारी आईला मिळणाऱ्या पेन्शनवारून वाद घालत त्यांना शिवीगाळ करण्यात आली़ ऐवढेच नाही तर या दोघांना घरा बाहेर हकलून देण्यात आले़ याबाबत पोलिस ठाण्यात येऊन अमृतराव फतपुरे यांनी आपल्या मुलांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही मुलं विनोद अमृतराव फतपुरे, धिरज फतपुरे आणि सूनांच्या विरोधात आई- वडील जेष्ठ नागरीक निर्वाह व कल्याण कायद्यानुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पासष्टी ओलांडलेल्या आमृतराव फतपुरे यांना धीरज नावाच्या मुलाने घर बांधण्यासाठी त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांकडून तीन लाख रुपये दिले होते. ते मला परत करा़ असे सांगून शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यात आली़ आमृतराव फतपुरे यांनी तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांना मारहाण केल्यानंतर दोन्ही मुलांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला घराबाहेर हकलले़ येथून थेट वृध्द अश्रमात जा परत घरात आला तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली.  या जेष्ठ नागरीकांनी सिडको पोलिस ठाणे काढून पोलिस ठाण्यात या प्रकरणाची कैफियत पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या समोर मांडली. सहाय्यक फौजदार एम. ए. पठाण पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...