आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भारत बंदला हिंसक वळण..कोथरूडमध्ये पीएमटी पेटवली; कोल्हापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्ये रस्त्यावर उतरले आहे. अज्ञात समाजकंटकांनी कोथरुडमध्ये पीएमटी बस पेटवले. तसेच कुमठेकर रस्त्यावर पीएमपीची बस फोडली आहे.

 

'पीएमटी'वर दगडफेक हे दोन अपवाद वगळता शहर सुरळीत चालू. सकाळी मार्केट यार्डातले व्यवहारही नेहमीप्रमाणे झाले. पुण्यात काँग्रेसने टांगा रॅली काडून इंधन दरवाढीचा निषेध करण्‍यात आला आहे. दरम्यान,मुंबई, नवी मुंबई भागात बहुतेक व्यवहार अजून तरी सुरळीत आहे.  अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे दिसत आहे.

 

कोल्हापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
कोल्हापूर-
भारत बंदसाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. घोषणा देण्यावरुन दोन कार्यकर्त्यांमध्ये भररस्त्यात मारामारी झाली.  पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मार खाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याने रॅलीतून पळ काढला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पुण्यात भारत बंदला लागलेल्या हिंसक वळणाचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...