आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघप्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस खुश...चंद्रपूरमध्ये झळकवले ‘धन्यवाद’चे बॅनर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले होते. भागवत यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांना धन्यवाद देणारे बॅनर्स चंद्रपूरमध्ये लावले असून हे बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. 


चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे बॅनर्स शहरभर लावले गेले आहेत. अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट करताना देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठे बलिदान दिले असून देशाला अनेक मोठे नेते दिल्याचेही भागवत यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्याकडे लक्ष वेधून चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीने हर हर काँग्रेस, घर घर काँग्रेसचा नारा देत शहराच्या अनेक भागांत त्यांना धन्यवाद देणारे बॅनर्स झळकवले आहेत. काँग्रेसच्या या बॅनर्सने भाजपची पंचाईत झाली आहे. काँग्रेसचे धोरण पाहता भागवत यांच्या वक्तव्याकडे उपाहासात्मक पद्धतीने पाहिले जात असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...