आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसवर राज्य सरकारचा दबाव; काँग्रेसचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील नालासोपारा येथील शस्त्रसाठाप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकावर (एटीएस) फडणवीस सरकार दबाव आणत होते, असा आरोप करत त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी या आशयाचे ट्विट केले आहे. 

 

नालासोपारा येथून १० ऑगस्ट रोजी गोरक्षक दलाच्या पाच कार्यकर्त्यांना एटीएसने स्फोटकांसह अटक केली होती. याप्रकरणी तपास करताना जरा दमाने घ्या, अशा सूचना राज्य सरकारकडून एटीएसला दिल्या होत्या, असा आरोप सावंत यांनी केला आहे. राज्यातील भाजप सरकार सनातन संस्थेला पाठीशी घालत आहेत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपासंदर्भात उत्तर द्यायला हवे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. नालासोपाऱ्यात १० आॅगस्ट रोजी वैभव राऊत याच्या घरी मोठ्या प्रमाणात गावठी बाॅम्ब सापडले होते. 


त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणाशी संबंधित राज्याच्या विविध भागांतून १४ संशयितांना ताब्यात घेतले आहे. नालासोपारा प्रकरणाची व्याप्ती डाॅ. नरेंद्र दाभोळकर, काॅ. गोविंद पानसरे, एम. एस. कलबुुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काँग्रेसने केलेले आरोप गंभीर आहेत. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...