आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरीत रस्त्यावर ठिकठिकाणी झळकले आक्षेपार्ह पोस्टर्स...'स्मार्ट बायका कुठे जातात...?'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरीतील आकुर्डी परिसरात ठिकठिकाणी आक्षेपार्ह पोस्टर्स झळकले आहे. 'स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर', असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिला आहे. इलेक्ट्रीक पोलवर अशी पोस्टर्स लावण्यात आली आहे.

 

'स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर', अशी पोस्टर्स कोणी लावलीत तसेच पोस्टर्स लावण्यामागे नेमका काय उद्देश आहे, हे अद्याप समजू शकले नाही. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी तपास करण्‍यासाठी एक पथकही नेमले आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी 'आय लव्ह यू शिवंडे' आणि 'आयएम सॉरी' अशी पोस्टर्स झळकली होती. पिंपळे सौदागर भागात एका तरुणाने गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी 'आयएम सॉरी'चे पोस्टर लावले होते.

बातम्या आणखी आहेत...