आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Metoo कॅम्पेनमध्ये आता राधे माँचीही उडी..काय म्हणाली स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु, येथे सविस्तर वाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- #Metoo कॅम्पेनमुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. महिला अत्याचारांबाबत आता खुलेआम बोलू लागल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर, आलोक नाथ, केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांच्यासह अनेक दिग्गजांचे या कॅम्पेनमुळे पितळ उघडे पडले आहे. आता या वादात वादग्रस्त समजली जाणारी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ हिनेही उडी घेतली आहे. अत्याचार झाला त्याचक्षणी ‍महिलांनी आवाज उठवावा, असा सल्ला राधे माँने दिला आहे. जे चुकीचे आहे, ते समाजासमोर आणायलाच हवे, असेही तिने सांगितले.

 

काय आहे #Metoo कॅम्पेन?
#Metoo ही एक चळवळ आहे. या माध्यमातून पीडित महिला कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाचा त्या खुलासा करत आहेत. महिला खुलेआम आरोपीला समाजासमोर आणत आहेत.

 

पहिल्यांदा कुठे सुरु झाले?
दरम्यान, #Metoo कॅम्पेनची सुरुवात हॉलीवूडमध्ये झाली होती. 2006 मध्ये अमेरिकन सिव्हिल राइट्स अॅक्टिविस्ट तराना बर्क यांनी या कॅम्पेनची सुरुवात केली होती. बर्क यांनी 11 वर्षांनंतर 2017 मध्ये हॉलीवूडचा आघाडीचा प्रोड्यूसर हार्वी वाइंस्टीनबाबत धक्कादायक खुलासे केले होते. नंतर हार्वीला कंपनी सोडावी लागली होती. त्याचे करिअर उद्धवस्त झाले होते.

 

आतापर्यंत या दिग्गजावर झाले आहेत आरोप...
देशात #Metoo कॅम्पेनची सुरुवात बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने करून दिली आहे. तिने मागील चार दशके अभिनयाच्या  क्षेत्रात काम केलेले पद्मश्री पुरस्कार विजेते नान पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर विकास बहल, चेतन भगत, रजत कपूर, कैलाश खैर, जुल्फी सुईद, आलोक नाथ, गायक अभिजीत भट्टाचार्य, तमीळ लेखक वैरामुथु आणि मोदी सरकारमधील मंत्री एमजे अकबर यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...